मा. माजी आमदार श्री. अमितजी घोडा साहेब यांचे हस्ते पौष्टीक तृणधान्य मिनिकिट वाटप

मौजे धुंदलवाडी येथील नरेशवाडी येथे आयोजित आत्मा अंतर्गत शेतीशाळेत उपस्थित मा. माजी आमदार श्री. अमितजी घोडा साहेब यांचे हस्ते नाचणी बियाण्याचे मिनिकिट वाटप करण्यात आले. यावेळी मा आमदार साहेब यांनी शेतकऱ्यांना नाचणी लागवड करून स्वतःचे आरोग्य आणि लागवड क्षेत्र वाढवावे याबाबत आवाहन केले.मा. श्री. अनिल पाटील कृषिभूषण शेतकरी वाडा यांनी भात लागवड क्षेत्र दिवसेंदेवस कमी होत आहे त्यास उपाय म्हणून यांत्रिक भातशेती करावी असे आवाहन केले. जगदीश पाटील मंडळ कृषि अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड करणे आणि त्याचे आहारात सेवन करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →