तलासरी तालुक्यातील सवणे गावात पंचायत समिती उपसभापती यांचेहस्ते मिनिकिट वाटप

दि.06/07/2023
वडवली ता. तलासरी

ग्रुप ग्राम पंचायत वडवली सवणे ग्राम सभेमध्ये सन्मा. उप सभापती पंचायत समिती, तलासरी
श्री. नंदकुमार हाडळ आणि
सन्मा. सरपंच प्रमोद ओझरे यांच्या हस्ते आणि सन्मा. ग्रा पं.सदस्य यांच्या उपस्थितीत नागली बियाण्याचे मिनिकीट शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. सदर पिकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे.आपल्या आहारात सकस आहार म्हणून वापर करावा असे आवाहन ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांना करण्यात आले.

संजय जगताप कृषि पर्यवेक्षक यांनी भातपिक विमा सप्ताह सुरु असून सर्वच शेतकऱ्यांनी एक रुपयात भात पिकाचा विमा उतरवावा असे आवाहन केले आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली.
आत्मा विभागाचे BTM श्री. स्वप्नील पाष्टे यांनी PMFME विषयी आणि शेतकरी गटाची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →