आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने कापडणे ता. धुळे येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हुरडा पार्टीचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यासाठी मौजे कापडणे येथील प्रगतशील शेतकरी तसेच उत्पादन उत्पादकता पीक स्पर्धा यामध्ये पारितोषिक मिळवलेले श्री राजाभाऊ पाटील यांचे रब्बी ज्वारीच्या शेतात आज माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व कापडणे गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हुरडा पार्टीचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्री गावित साहेब, प्रकल्प उपसंचालक आत्माचे श्री सोनवणे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री वाल्मीक प्रकाश सर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नांद्रे सर व कातेपुरी सर, स्मार्ट योजनेचे नोडल अधिकारी श्री विनय बोरसे साहेब व श्री जीके चौधरी साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती मनीषा पाटील, कृषी पर्यवेक्षक श्री एस पी देवरे व श्री पीडी पवार, कृषी सहाय्यक श्री नितीन मासुळे श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीमती रीना देवरे, श्रीमती अनिता पवार, हे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →