पालघर मधील कमारे येथे कृषि दिन निमित्त यंत्रद्वारे लागवड प्रात्यक्षिक

आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे कमारे येथे कृषि दिना निमित्त श्री. जयप्रकाश राऊत यांच्या शेतावर भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत आंबा लागवड करण्यात आली तसेच मोजे वरखुंटी येथे श्री.राजेंद्र पाटील यांच्या शेतावर यंत्राने भात लागवड करण्या बाबत चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित शेतकरी महिला / पुरुष यांना नागली बियाणे मिनी किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्रीम पारधी जान्हवी मॅडम.कृषि पर्यवेक्षक, पालघर.श्रीम. सपना पिचड,श्रीम. हेमलता भोइर कृषि सहाय्यक तसेच श्रीम. लतिका पारधी महिला बचत गटाच्या अध्यक्षा. आदि उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →