कृषि विज्ञान केंद्र कोसबाड येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत नाचणीचे मिनिकिट मान्यवरांचे हस्ते वाटप

आज दिनांक १ जुलै रोजी कोसबाड कृषि विज्ञान केंद्रात माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास शेतकरी व विविध अधिकारी शास्रज्ञ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कैनाड गावच्या सरपंच सौ.नूतन चिपट होत्या. तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमाती सस्ते मॅडम , कृषि विज्ञान केंद्र कोसबाड येथील मुख्य शास्रज्ञ जाधवसर, इतर शास्रज्ञ , नरगुलवार साहेब, पंचायत समिती कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी सर्व, ठाणे येथील कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ उपस्थित होते. सदर कृषि दिन पंचायत समिती डहाणू , कृषि विभाग डहाणू आणि कृषि विज्ञान केंद्र कोसबाड यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तसेच आज कृषि संजीवनी सप्ताह समारोप देखील करण्यात आला.
कृषि दिनानिमित्त कोसबाड येथे मान्यवरानी आपल्या भाषणात सांगितले की, वसंतराव नाईक यांनी भविष्याचा विचार करुन कृषि क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कृषि विभागाच्या विविध योजना लाभ घेणेसाठी महाडीबीटी वर विविध योजना मिळवणेसाठी ऑनलाइन अर्ज करावा. पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे करीत असल्याने या वर्षी कृषि विभाग मोठ्या प्रमाणात नाचणी लागवड प्रात्यक्षिके आयोजित करीत आहे. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून पौष्टिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढीस हातभार लावावा, असे आवाहन जगदीश पाटील यांनी केले.पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढवून आपले आरोग्य टिकवून ठेवावे, यासाठी आपल्या आहारात नागली , वरी, ज्वारी, बाजरी याचा वापर वाढवावा. यावेळी मान्यावरचे हस्ते भात पीक स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या शेतकऱ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच पौष्टिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढावे यासाठी मान्यवरचे हस्ते नाचणी मिनिकिट वाटप करण्यात आले. कोसबाड येथील कार्यक्रमास कृषिभूषण शेतकरी श्री. यज्ञेश सावे., मिलिंद बाफना आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →