चिंचणी येथे मा. कृषि मंत्री यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्यबाबत मार्गदर्शन

मौजे चिंचणी, ता. डहाणू येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमास मा. कृषि मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितीत राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नोडल अधिकारी श्री. जगदीश पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य पिकाबद्दल मार्गदर्शन केले. क्षेत्र वाढीसाठी पिक प्रात्याक्षिके राबविण्यासाठी सहभागी होण्याबाबत आवाहन केले. या कार्यक्रमास मा. कृषिमंत्री यांनी चिकू पिक विमा हप्ता कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्येक गावात पर्जन्य मापक यंत्र बसविणे बाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.भाजीपाला विक्री गटामार्फत करणेकरीता प्राधान्य देण्यात येईल. सदर कार्यक्रमास मा. खासदार राजेंद्र गावित, पुरस्कार प्राप्त शेतकरी, मा. विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे अंकुश माने साहेब , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुमारे ६३० शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →