डहाणू तालुक्यातील गाव गावात शेती शाळेत शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली .

आज दिनांक-१/०२/२०२३ रोजी मौंजे गांगणगाव पाटील पाडा येथे आत्मा अंतर्गत मिरची लागवड शेती शाळा आयोजित करण्यात आली होती. सदर शेतीशाळेस मार्गदर्शन श्री विशाल नाईक कृषी सहाय्यक धामणगाव, श्री अशोक महाले सहाय्यक तंत्रज्ञान डहाणू यांनी मिरची पिकावरील कीड व रोग नियंत्रण तसेच पाणी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. सदर शेती शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023 वर्ष साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करून उपस्थित शेतकऱ्यांना घडी पत्रिका वाटप करून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर शेती शाळेत प्रगतशील शेतकरी श्री सिल्वेस दांडेकर आणि शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →