पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगाव गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन सभा.

आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी वि. म. पाटिल कृषी प्रतिष्ठान आसनगाव येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मार्गदर्शन सभा कृषी विभागाने आयोजित केली. यावेळी वि. म. पाटिल कृषी प्रतिष्ठान संस्थेचे विद्यार्थी व आसनगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती पाटिल, डॉ. सृष्टी मौर्या, डॉ. तन्वी पाटिल, प्रा. सोनालिका पाटिल, , अक्षय पाटिल, विभाकर कोरे ,प्राध्यापक,कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन सभा संपन्न झाली. यावेळी कृषी विद्यालयाचे व फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीस प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.उपस्थित सर्वांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी वानगाव श्री पवार साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत प्रस्तावना मांडली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या रोजच्या आहारात पाव वडा, पिझ्झा, बर्गर याचा वापर न करता ज्वारी, बाजरी,आणि नागली यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थाचा वापर करावा. आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व अनन्यसाधारण आहे असं मत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी डहाणू श्री जगदीश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित शेतकऱ्यांसमवेत शपथ घेतली की आम्ही किमान आठवड्यातून एकदा तरी पौष्टिक तृणधान्यपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू. तसेच या गुरुकुल चे अध्यक्ष श्री.मिलिंद पाटील यांना देखील विनंती केली की, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना देखील आठवड्यातून एकदा पौष्टीक तृणधान्य पासून बनवलेले अन्नपदार्थ सेवन करण्यास द्यावे. एरवी आपण फक्त पोट भरू पाहतो, म्हणजेच जे मिळेल ते आपण त्या वेळेला खातो. आपल्यासमोर झटपट मिळणार एकमेव आहे ते वडापाव, यानंतर पिझ्झा बर्गर याचा वापर आहारात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपण विविध आजाराला बळी पडतो. हे सर्व टाळायचं असेल तर आपल्या घरचे बनवलेले पदार्थ नियमित खावं असा आवाहन सर्वांना केलं.ज्वारी, बाजरी, नाचणी ,वरी या तृणधान्ये मध्ये सर्व आवश्यक खनिजे आणि फायबर असतो. तसेच ते मधुमेहापासून देखील आपणास दूर ठेवतो.त्यामुळे ते खाण्यास आरोग्यदायी आहे. तालुका कृषी अधिकारी श्री.अनिल नरगुलवार साहेब यांनी पौष्टीक तृणधान्य आहारात वापरणे म्हणजे आपले आरोग्य आपल्या हातात ठेवणे असे मत व्यक्त केले. कृषी विभागाच्या महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या सर्वांचा आरोग्य चांगलं राहावं, यासाठी सर्वानी पौष्टिक तृणधान्य वापर आहारात करणे गरजेचे आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये तंतुमय पदार्थ असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. रक्तदाब कमी कमी करण्यास मदत व हृदयरोगापासून लांब ठेवणे. दमा सारख्या शोषण रोगात या नियंत्रणात देखील मदत होते. म्हणूनच जास्तीत जास्त क्षेत्र पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीखाली आणून त्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. आणि रोजच्या आहारात याचा वापर वाढवणे. आसनगाव चे कृषी सहाय्यक थोरात यांनी विद्यार्थ्यांकडून पौष्टिक तृणधान्याच्या म्हणी वदवून घेतल्या. श्री अशोक महाले यांनी पौष्टिक तृणधान्य पासून विविध पदार्थ बनवले जातात आणि त्याचा वापर रोजच्या आहारात आपण करू शकतो. याबाबत माहिती दिली. कृषी सहायक थोरात यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →