आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत पौष्टीक तृण धान्याचे आहारातील महत्व व जन जागृती कार्यक्रमाचे खामगाव ता फलटण येथे आयोजन

श्री वैभव गायकवाड यांनी पौष्टिक तृणधान्याच्या आहारातील महत्त्व विशद केले त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व यावरती सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच महिला शेतकरी बचत गटामार्फत पौष्टिक धान्यावरती आधारित विविध प्रक्रियायुक्त आधारित प्रकल्पांची उभारणी करून गटाच्या माध्यमातून उत्पादन व विक्री केल्यास महिला बचत आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. त्याकरता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून सहकार्य घेण्याचे आवाहन श्री सागर डांगे तालुका कृषि अधिकारी फलटण यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →