वाडा तालुक्यात रानभाजी महोत्सवात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दि.24/08/2023 रोजी तालुका कृषि अधिकारी वाडा यांच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव व कृषि पायाभूत सुविधा निधी बाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास भिवंडी/वाडा विधान सभेचे आमदार मा.श्री.शांतारामजी मोरे साहेब, तथा समिती प्रमुख भटक्या जाती व विमुक्त जमाती, महाराष्ट्र राज्य व वाडा तालुक्याचे तहसिलदार मा.श्री.भाऊसाहेब अंधारे , जि.प.सदस्य मा.श्री. राजेशजी मुकणे साहेब, जि.प.सदस्या मा.श्रीम. अक्षता चौधरी मॅडम,प्रगतशिल शेतकरी श्री.वैभव पाटील-देवळी,
बंटी पाटील- सापरोंडे ,श्री.कोंडु पष्टे – निचोळे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. एस. टी. घरत, कृ. प. चिंचघर यांनी केली त्यानंतर ” रान भाजीचे आहारातील महत्व , प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या बाबत तालुका कृषि अधिकारी – वाडा श्री.शिवाजी इंगळे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकर्याना सविस्तर मार्गदर्शन केले .त्या नंतर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.हारेश बांगर यांनी AIF व पौष्टिक तृणधान्य या बाबत सविस्तर माहीती दिली.त्या नंतर मा.आमदार महोदय व जि.प.सदस्य यांच्या शुभहस्ते वाडा तालुक्यात भात ,नाचणी,कडधान्य यापिकाचे अधिक उत्पादन घेणार्या प्रगतशिल शेतकर्याना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.सदर कार्यक्रमास श्री.अहिरे साहेब व श्री. बुटले साहेब, मंडळ कृषि अधिकारी गोऱ्हे व वाडा,कृषि अधिकारी – एस.आर.पाटील सर्व कृषि पर्यवेक्षक, सर्व कृषि सहाय्यक, श्रीम. ज्योती कडव सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक, बँक व्यवस्थापक व तालुक्यातील 60 शेतकरी व enterprineur उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रामुख्याने बळीराजा सेंद्रिय शेतकरी गट निचोळे, एकलव्य महिला गट गारगाव व आशीर्वाद शेतकरी गट कांबारे तसेच तालुक्यातील शेतकरी यांनी रानभाज्या व पाककृती बनवून आणली होती व चांगल्या प्रकारे विक्री झाली व कार्यक्रम यशस्वी झाला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *