डहाणू तालुक्यातील दाभाडी येथे पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप

दिनांक ११जुलै रोजी दाभाडी येथे नागली बियाणे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित प्रगतशील शेतकरी तशेच कृषी पर्यवेक्षक-आंबोली श्री.एस.एम.मुंढे यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, वैयक्तिक शेततळे,१रुपया मध्ये पिक विमा योजना विषयावर सविस्तर माहिती दिली.तशेच कृषी पर्यवेक्षक -कासा श्री.एच.आर.वाघमारे यांनी फळबाग योजना, यांत्रिकीकरण,महाडीबीटी, चार सुत्री पद्धतीनं लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक किन्हवली श्री. चंद्रकांत वळवी यांनी ई पिक पाहणी पिक नोंदणी,ई केव्हासि करणे बाबत मार्गदर्शन केले, व सर्वांचे आभार मानले.यावेळी शेतकरी महिला,व पुरूष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →