डहाणू तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुक्यातील सल्ला समिती बैठक मा. आमदार साहेब यांचे उपस्थितीत संपन्न

आज दिनांक १३ जुलै रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्मांतर्गत तालुका स्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा घेण्यात आली. या सभेस तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असे एकूण २५ जण उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थान मा. आमदार श्री. विनोद निकोले साहेब यांनी भूषविले.या सभेत परंपरागत कृषि विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत गट स्थापने बाबत मार्गदर्शन श्री. नामदेव वाडिले ( BTM) यांनी केले. तसेच आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम बाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या परराज्यातील सहली आयोजित करताना आपल्या कडील पिकाचे जास्त उत्पादन वाढावे या दृष्टीने ठिकाण निवडून सहल आयोजित करावी असे मा. आमदारसाहेब यांनी सुचविले. यावेळी मा पंकज कोरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी गुजरात मधिल नवसारी युनिव्हर्सिटी येथे शेतकरी सहल न्यावी जेणेकरून त्यांचेकडील अद्ययावत तंत्रज्ञान वापरुन आपले उत्पादन वाढेल.मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे साठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करावी असे मत सल्ला समितीतील शेतकऱ्यांनी मांडले. यास मा सभापती महोदय यांनी मोकाट गुरे गरजू शेतकऱ्यांना दिल्यास त्यांना फायदा होईल असे सांगितले. गोशाला बांधून त्यांचे ताब्यात मोकाट गुरे सोपवावी असे मत आमदार साहेब यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळताना अडचणी निर्माण होतात तरी मा आमदार साहेब यांनी जिल्हाधिकारी महोदय यांचे मार्फत बँकावर अंकुश ठेवणे बाबत प्रयत्न करावे.पौष्टीक तृणधान्य अंतर्गत नागली पिकाचे क्षेत्र वाढीची दृष्टीने प्रत्येक कृषि सहाय्यक त्यांच्या सजेत मिनिकिट वाटप करीत आहेत, असे श्री. जगदीश पाटील मंडळ कृषि अधिकारी यांनी सांगितले. पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व उपस्थित मान्यवर याना समजावले. शेतकऱ्यांना पीक विमा योजना चित्ररथाचे आगमन झाले. या रथास तालुक्याचे आमदार मा. विनोद निकोलेसाहेब यांनी श्रीफळ वाढवून तालुक्यातील प्रत्येक गावात फिरणेसाठी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. पंकज कोरे साहेब, पंचायत समितीचे सभापती श्री.प्रविण गवळी , तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य , शैलेश करमोडा, लतिका लहू बालशी, जयवंत डोंगरकर, व तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी मा . आमदार महोदय यांनी सर्व तालुक्यात विमा रथ फिरवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा भात पीक विमा काढावा, अशी सूचना विमा प्रतिनिधीना केली. यावेळी चोला मंडलम इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी श्रींकांत मुकणे उपस्थित होते. त्यांचे तालुक्याचे शेतकऱ्यांसाठी असलेल्या कार्यालयाची उद्घाटन मा. आमदार महोदय श्री. विनोद निकोले साहेब यांनी केले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी डहाणू आणि तालुक्यातील सर्व कृषि पर्यवेक्षक , आणि कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →