मौजे – कांदरवाडी दिनांक- ३०/०६/२०२३ कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत गाव बैठक घेण्यात आली या वेळेस खालील माहिती देण्यात आली.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषि यांञिकीकरण योजना, बिज प्रक्रिया, वैयक्तिक शेततळे योजना, सामूहिक शेततळे योजना, म.ग्रा.रो.ह.यो.फळबाग योजना ,चार सुञी भात लागवड,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम वर्ष 2023,अंतर्गत नागली लागवड, वरई लागवड, व पारंपरिक शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करून नागली लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे मान्य केले.आठवड्यातून एकवेळ तरी नागलीची भाकरी सर्व कुंटुबाना खाऊ घालण्याचे मान्य केले.या सर्व योजनेविषयी श्री. पी एस पाटील कृषि सहाय्यक श्री. हरिश्चंद्र वाघमारे कृषी पर्यवेक्षक कासा यांनी मार्गदर्शन केले व गावाचे उपसरपंच श्री. जीवन परहाड व शेतकरी उपस्थित होते.