डहाणूतील वाघाडी येथील कृषि संजीवनी कार्यक्रम

कृषि संजीवनी सप्ताह 2023 आज दिनांक 28/06/2023 रोजी मौजे-वाघाडी येथे जमीन सुपिकता जागृती दिनाचा मंडळ कासाचा कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी मा. श्री.रवींद्र पाचपुते साहेबांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमला उपस्थित अनिल नरगुलवार साहेब मंडळ कृषि अधिकारी मनोर यांनी म .ग्रा. रो .हो. यो.फळबाग लागवड व खरीप पीक विमा योजना वर मार्गदर्शन केले, तसेच के.व्ही. के.कोसबाड चे शास्त्रज्ञ अशोक भोईर सरांनी शेतकऱ्यांना जमिन सुपिकता व माती परीक्षण वर सविस्तर मार्गदर्शन केले, मंडळ कृषि अधिकारी कासा सुनिता सरगर मॅडम यांनी सर्वसमावेशक पीक विमा योजना 1 रु भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले,कार्यक्रमास उपस्थित वाघाडी चे सरपंच प्रशांत सातवी साहेब ,पंचायत समिती डहाणू च्या माजी सभापती हेमलता सातवी मॅडम यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावे असे आव्हान केले. आजच्या कार्यक्रमला कृषि पर्यवेक्षक कासा वाघमारे साहेब, कृषी पर्यवेक्षक गंजाड गायकवाड साहेब व कृषी सहाय्यक,मंडळ कासा चे सर्व कृषी सहाय्यक व वाघाडी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,महिला बचत गटाचे अद्यक्ष,प्रगतिशल शेतकरी , शेतकरी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →