वाडा तालुक्यातील मौजे डाहे येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा सन्मान

मौजे डाहे येथे आज दिनांक 27.06.2023 रोजी कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात कृषी महिला शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात उपस्थित महिला शेतकरी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आले.तसेच महिलांचे शेतीतील योगदान,pmkisan ekyc, म.ग्रा.रो. ह. यो.फळबाग लागवड, भात लागवड पद्धती, खत व्यवस्थापन,कृषी यांत्रिकीकरन , सिंचन योजना,MIDH,PMFME , पौष्टिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढ ,व इतर योजना याबत सखोल मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी श्री.एस.आर. गावडे साहेब यांनी केले. तसेच भात बियाणे, परस बाग किट बियाणे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री.एस जे. बुटले साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री.एस.एन.भोईर साहेब, कृषी सहाय्यक श्री. ए.एस. बेलकर साहेब, कृषी सहाय्यक श्री. सागर पाटील ,डाहे गावचे सरपंच श्रीम.वृषाली पाचलकर मॅडम, उपसरपंच श्रीम.संजिवनी फडवळे मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीम.सुनंदा मोरघा मॅडम व महिला शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →