डहाणू तालुक्यातील कैनाड येथे महिला साठी कृषि सन्मान दिन साजरा केला.

आज दिनांक २७ जून रोजी कैनाड येथील महिला शेतकऱ्यांच्या कृषि संजीवनी कार्यक्रमास गावाच्या सरपंच श्रीमती नूतन चिपात यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. कृषि सहाय्यक नीता वीरकर यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. mahadbt , पौष्टीक तृणधान्य क्षेत्र वाढीबाबत माहिती देवून जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा. यावेळी सरपंच मॅडम यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या आहारात नाचणी व वरई पासून बनवलेले खाद्यपदार्थ वापरल्यास आरोग्य चांगले राहते. यावेळी सुमारे ५८ महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →