डहाणू तालूक्यात कृषि संजीवनी कार्यक्रम पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

.धानिवरी (ईभाडपाडा)येथे दिं. 27/6/2023 रोजी महिला सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषि यांञिकीकरण योजना, बिज प्रक्रिया, वैयक्तिक शेततळे योजना, सामूहिक शेततळे योजना, म.ग्रा.रो.ह.यो.फळबाग योजना ,चार सुञी भात लागवड,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम वर्ष 2023,अंतर्गत नागली लागवड, वरई लागवड, व पारंपरिक शेतीविषयी महिला शेतकरी यांच्या सोबत सविस्तर मार्गदर्शन करून नागली लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे मान्य केले.आठवड्यातून एकवेळ तरी नागलीची भाकरी सर्व कुंटुबाना खाऊ घालण्याचे मान्य केले.या सर्व योजनेविषयी श्री एस.एम.मुंढे कृषि पर्यवेक्षक आंबोली यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी श्री एच.आर.वाघमारे कृषि पर्यवेक्षक, कासा ता.डहाणु शेतकरी हिरा कोरडा ,महिला शेतकरी सविता हिरा कोरडा.व ईतर शेतकरी महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →