डहाणू कासा मंडळात शासन आपल्या दारी अंतर्गत मौजे तवा गावात मार्गदर्शन सभा

आज दिनांक 30/5/2023 रोजी मौजे तवा येथील शेतकऱ्यांना श्रीमती.सरगर मॅडम मंडळ कृषी अधिकारी कासा यांनी
महा डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण योजना, भात बियाणे निवड , लागवडीच्या विविध पद्धती, mregs अंतर्गत फळबाग लागवड , सूक्ष्मसिंचन योजना, pmfme योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, इत्यादी योजनांबद्दल माहिती दिली , श्रीम. गीता वळवी मॅडम कृषी सहाय्यक ,तवा यांनी भात बीजप्रक्रिया व भात बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक करून दाखविले ,श्री. नामदेव वाडिले यांनी परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती ) बाबत माहिती दिली.आजच्या कार्यक्रमास श्री वाघमारे साहेब कृषी पर्यवेक्षक कासा , श्री. सुनील जाधव कृषि सहाय्यक घोळ , श्री. अजय आंबेकर कृषि सहाय्यक कासा , श्री. बालशी साहेब सरपंच तवा उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →