डहाणू तालुक्यातील मौजे रानशेत येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक: 30/ 5/ 2023 रोजी मौजे: रानशेत ग्रामपंचायत येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती महाडीबीटी ,शेतकरी अपघात विमा योजना इत्यादी माहिती श्री गायकवाड कृषी पर्यवेक्षक गंजाड यांनी दिली .तसेच भातबीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी, बियाणे विकत घेताना घ्यावयाची काळजी, एमआरजीएस फळबाग लागवडीविषयी माहिती, पौष्टिक तृणधान्य पीक प्रात्यक्षिक मध्ये सहभागी होणे याबाबत माहिती दिली. श्रीमती डाखोरे मॅडम कृषी सहाय्यक आगवन,व कृषी सहाय्यक राबड मॅडम यांनी माहिती दिली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच ज्योती वरखंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य रानशेत, गावातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.पौष्टीक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढविणे साठी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →