डहाणू मधील मौजे निकणे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात खरीप हंगाम पूर्वतयारी बाबत मार्गदर्शन

आज दिनांक: 30 /5 /2023 रोजी मौजे: निकने ग्रामपंचायत येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला .शासनाच्या विविध योजनांची माहिती ,महाडीबीटी, शेतीत काम करताना काही अपघात झाल्यास शेतकरी अपघात विमा योजनांची माहिती श्री गायकवाड कृषी पर्यवेक्षक गंजाड यांनी माहिती दिली .तसेच भात बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी, बियाणे विकत घेताना घ्यावयाची काळजी, MREGSफळबाग लागवड विषयीची माहिती ,पौष्टिक तृणधान्ये पीक प्रात्यक्षिक सहभागी होणे याबाबत माहिती व इतर योजनांची माहिती माहिती दिली. यावेळी श्री सचिन नाठे सर कृषी सहाय्यक सारणी, कृषी सहाय्यक ऐना राबड मॅडम व कृषी सहाय्यक रानशेत डाखोरे मॅडम यांनी माहिती दिली यावेळी निकणे ग्रामपंचायतीचे ग्रामशेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य निकणे, पिंपळसेत खुर्द, शेलटी या गावातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →