डहाणू तालुक्यातील बेंडगाव येथे शेतकरी शिबिरात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

काल दिनांक 16/5/2023 रोजी बेंडगांव येथे अपना फार्म किशन गोरडिया आणि विश्ववृत्ति फाउंडेशन श्री. मधु मोहिते वाडीचे व्यवस्थापक यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी डॉक्टर विलास जाधव सर शास्त्रज्ञ ( कृषी विज्ञान केंद्र कोसबाड डहाणू) शेती आणि पूरक व्यवसाय यावर मार्गदर्शन केले, श्री जगदीश पाटील साहेब मंडळ कृषी अधिकारी डहाणू यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याबरोबरच पुन्हा एकदा पारंपरिक पिके नागली,वरई पुन्हा पिकविण्यासाठी व आपल्या दैनंदिन आहारामध्ये गरजेचे उपयुक्तता याचं महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर बाजारात नागली वरई या तृणधान्य ला मोठी मागणी आहे माहिती पटवून दिली व योजना माहिती दिली, श्री. सुर्यभान मुंडे कृषि पर्यवेक्षक आंबोली साहेबांनी अपघात विमा योजना,मग्रारोहयो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश जाधव व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कृषि सहाय्यक यांनी, बीज प्रक्रिया व उगवण शक्ती याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, आंबा पिकाची काढणी साठवून व विक्री यावर मार्गदर्शन केले. या वेळी बेंडगांव येथे ६७ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →