आज मौजे आरडे तालुका कर्जत येथे खरीप पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण तसेच पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम संपन्न

आज मौजे आरडे तालुका कर्जत येथे खरीप पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण तसेच पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी माननीय तालुका कृषी अधिकारी श्रीमती शितल शेवाळे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी कशेळे श्री अशोक गायकवाड, जिल्हा आत्मा कमिटीचे सदस्य श्री चंद्रकांत मांडे, श्री उत्तम शेळके, श्री अजित पाटील व श्री केतन झांजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन केणे कृषी पर्यवेक्षक कळंब यांनी केले पी एम एफ इ या योजनेची सविस्तर माहिती श्री मंगेश गलांडे कृषी पर्यवेक्षक नेरळ यांनी दिली तसेच या कार्यक्रमासाठी श्री किरण गंगावणे कृषी पर्यवेक्षक कशेळे, श्री विजय गंगावणे कृषी सहाय्यक श्री आकाश गावंडे कृषी सहाय्यक श्री विनोद जाधव कृषी सहाय्यक, आत्मा योजनेच्या श्रीमती रेश्मा मते मॅडम, श्रीमती मीनल देशमुख मॅडम तसेच संपूर्ण परिसरातील शेतकरी बंधू व महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी श्री सचिन केणे कृषी पर्यवेक्षक कळंब तसेच श्री विजय गंगावणे कृषी सहाय्यक सालोख तर्फे वरेडी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद🙏🏼🌹

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →