पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त परभणी तालुक्यातील मौजे दैठणा येथे दिनांक 9/02/2022 रोजी पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती उज्वलाताई कच्छवे सरपंच दैठणा ह्या होत्या.
प्रमुख मार्गदर्शक…कैलास गायकवाड , (मंडळ कृषी अधिकारी…दैठणा.) , विनोद जोशी (कृषी सहाय्यक पोखरणी) हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश माने (कृषी सहाय्यक .दैठणा) यांनी केले त्यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष का ? साजरे करायचे याचे महत्त्व विशद केले.
कैलास गायकवाड यांनी हरित क्रांती व त्यानंतर मानवी जीवनातील आहारात झालेला बदल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
विनोद जोशी यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्य चे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती उज्वला कच्छवे यांनी दैनंदिन जीवनात महिलांनी पौष्टिक तृणधान्य चा वापर वाढवावा असे आपले मनोगत व्यक्त केले.महिलांनी पाककला मध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला.
आभार श्रीमती शोभा आचार्य (सुपरवायझर गटप्रवर्तक )यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागात कर्मचारी रोशन करेवार, विजय हातोले , अतुल चव्हाण , विनोद जोशी उमेश माने यांनी परिश्रम घेतले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →