आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने 4 हजार किलो भगर पाककृती (Little Millets in single vessel) बनवून जागतिक विक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने भगर मिल असोसिएशन नाशिक व कृषि विभाग नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत प्रख्यात शेफ श्री विष्णू मनोहर यांचा नाशिकमध्ये रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी 4 हजार किलो भगर पाककृती (Little Millets in single vessel) बनवून जागतिक विक्रम करत आहेत. यावेळी कार्यक्रमास मा.श्री.राधाकृष्ण गमे साहेब, विभागीय आयुक्त नाशिक, मा.श्री.विकास पाटिल साहेब, कृषि संचालक , मा.श्री. गंगाथरन डी साहेब, जिल्हाधिकारी नाशिक, मा.श्री.पुलकुंडवार , आयुक्त नाशिक महानगरपालिका, तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थीत राहून मार्गदर्शन केले तृणधण्याचं आहारात समावेश करणे बाबत जनतेला आवाहन केले व उपक्रमाचे कौतुक केले सोबत श्री.मोहन वाघ, वि.कृ. स.सं. नाशिक विभाग, श्री.विवेक सोनवणे, जि.अ.कृ.अ. नाशिक तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी. तसेच मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते. त्यांनी पौष्टिक तृणधान्ये बाबत माहिती घेतली. यावेळीं बनवण्यात आलेली 4 हजार किलो भगर ही शहरातील नागरीक, दवाखाना, अनाथआश्रम, वृद्धाश्रम, विद्यार्थी वसतिगृह, शेतकरी, सामाजिक सेवा संस्था ईत्यादीना मोफत वाटप करण्यात आली. यावेळी सुमारे २० हजार नागरिकांनी भगरीचा आस्वाद घेतला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →