जव्हार तालुक्यातील पिंपळशेत गावात जिल्हा परिषद सदस्य उपस्थितीत पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम.

आज दिनांक 10 2 2023 रोजी पिंपळशेत तालुका जव्हार येथे सकाळी 10.30 वाजता पौष्टिक तृणधान्य व PMFME योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला या प्रशिक्षण वर्गाला जिल्हा परिषदेचे सदस्य श्री धूम साहेब अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नेरकर साहेब त्याचप्रमाणे ,कृषी विज्ञान केंद्र कोसबाड चे श्री भोईर साहेब, सरपंच दिनेश जाधव ,सरपंच डेंगाची भेट पडवळ, तसेच शेतकरी विजय म्हाला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य अंतर्गत नागली पिकापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन लावण्यात आले होते ,या प्रदर्शन चे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नेरकर साहेब यांनी केले प्रशिक्षण वर्गानंतर मिरची पिकावर ड्रोन द्वारे फवारणी याबाबत पिंपळस येथील 42 एकर मिरची क्षेत्रावर क्षेत्र भेट देऊन प्रात्यक्षिक घेण्यात आले याप्रसंगी परिसरातील बहुसंख्य शेतकरी महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री वसंत नागरे यांनी केले तर सूत्रसंचालन रवी खरात यांनी केले या कार्यक्रमाची साठी जव्हार तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक विकास भदाणे त्याचप्रमाणे आत्म्याची बीटीएम श्री सुनील मालक यांनी मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →