डहाणू तालुक्यातील चारोटी गावात पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी अंतर्गत चित्र रथ मार्फत मार्गदर्शन

डहाणू तालुक्यातील चारोटी प्राथमिक शाळा येथे उपस्थित सरपंच आणि शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याबाबत महत्व पटवून दिले. यावेळी पौष्टिक तरुण धान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत चित्ररथ मार्फत माहिती देण्यात आली. तसेच येथील शिक्षिका यांनी देखील उपस्थित शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक गुणधर्म आपल्या आहारात महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले. सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात किमान आठवड्यातून एकदा तरी पौष्टिक तरुण धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ द्यावे अशी विनंती नोडल अधिकारी जगदीश पाटील यांनी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →