डहाणू तालुक्यातील गंगाणगाव येथे महिला शेतकऱ्यांना खरीप हंगाम नियोजन आणि नागली लागवडी बाबत माहिती देण्यात आली

आज दिनांक 30/5/2023 रोजी मौजे गांगणगाव येथे बचत गटातील महिला व शेतकऱ्यांना श्री जगदीश पाटील मंडळ कृषी अधिकारी डहाणू यांनी, पौष्टीक तृणधान्य नाचणी, वरई लागवड बाबत माहिती देवून महत्व पटवून दिले.
महा डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण योजना, भात बियाणे निवड , लागवडीच्या विविध पद्धती, mregs अंतर्गत फळबाग लागवड , सूक्ष्मसिंचन योजना, pmfme योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, इत्यादी योजनांबद्दल माहिती दिली, महिलांना भाजीपाला मिनी किट वाटप करण्यात आले , श्री.विशाल नाईक कृषी सहाय्यक ,गांगणगाव यांनी भात बीजप्रक्रिया व भात बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक करून दाखविले , श्री संदीप कांबळे यांनी अदानी ग्रुप यांचे मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना यांच्याबाबत माहिती दिली आजच्या कार्यक्रमास श्री रमेश डोलारी कृषी पर्यवेक्षक दापचारी, श्री संदीप धामोडा कृषि सहाय्यक बोर्डी, श्रीमती कटेला मॅडम, माजी सरपंच गांगणगाव , श्री सुनील राजड माजी उपसरपंच गांगणगाव उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →