मोखडा तालुक्यात खरीप पूर्व तयारी बाबत मार्गदर्शन व नागली बियाणे वाटप

मौजे खोच आणि मौजे शिरसोन, धामणशेत,पोशेरा , हिरवे, मोखाडा, घोसाळी, अमलेब या गावत गावबैठक आणि घेण्यात आली तसेच भात व नागली बियाणे वाटप करण्यात आले. तसेच भात बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाएस सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मोखाडा व घोसाळी येथे परसबाग मिनिकिट व नागली बियाणे मा. राठोड साहेब तालुका कृषी अधिकारी, मोखाडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सोबत भरत पवार कृषि पर्यवेक्षक मोखाडा, आनंद गवई कृषि सहाय्यक मोखाडा, झोपळे बी.टी.एम., देशमुख साहेब उपस्थित होते.

आज दि.२९/०५/२०२३ सोमवार रोजी,मौजे-पोशेरा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM)अंतर्गत प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत शेतकरी/लाभार्थींना नागली(नाचणी) बियाणे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात श्री सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी,नागली लागवडीबाबत,बीजप्रक्रिया,वाफ्यांवर रोपे तयार करणे, लागवडीची पद्धत,नागलीचे रोपे अंगठ्याच्या सहाय्याने लागवडीचे महत्व व फायदे,लागवडीचे अंतर,खते व पाणी व्यवस्थापन मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास पोशेरा ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →