पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन

आज दिनांक 8 /2 /2023 रोजी केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर ,जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने “भारत सरकारच्या विकासाची ८ वर्षे व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे करण्यात आले सदर प्रदर्शनात कृषी विभागाचे स्टॉल लावण्यात आले या स्टॉलवर ज्वारी, बाजरी ,नाचणी ,वरई ,कोदो, राजगिरा इत्यादी पौस्टीक तृणधान्ये ठेवण्यात आले यासोबतच या धान्य विषयी माहिती देणाऱ्या माहिती पत्रिका पोस्टर्स घडी पत्रिका ठेवण्यात आले या प्रदर्शनात पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट आकर्षणाच्या विषय ठरला, कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्टॉलला भेट देणाऱ्या मान्यवरांना ज्वारीपासून बनविलेली आंबील पिण्यासाठी देण्यात आली यावेळी मुख्य तिथी म्हणून मा श्री निखिल पिंगळे सर जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री अनिल पाटील सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया श्रीमती स्मिता बेलपात्रे मॅडम निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया श्रीमती निकिता जोशी मॅडम संचालक केंद्रीय संचार ब्यूरो, श्री रवी गीते जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया, श्री हिंदुराव चव्हाण सर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर प्रदर्शन 10.2.2023 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →