राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी व कृषि विभाग,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा सखी प्रशिक्षणाचा उदघाटन सोहळा संपन्न.

दिनांक 03/02/2023

जिल्हा पोलिस मुख्यालय,रत्नागिरी प्रशिक्षण हॉल येथे,

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व मा.एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी, येथे आयोजित बॅच क्रमांक 3 – आपदा सखी प्रशिक्षणाचे उदघाटन सोहळा आज दिनांक 03/02/2023 सकाळी 11.00 वाजता संपन्न झाला.
यावेळी मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, श्रीम. सुनंदा कुऱ्हाडे मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023. निमित्ताने उपस्थित आपदा सखींना आहारातील तृणधान्य पिकांतील पोषण मूल्यांचे महत्त्व,त्यांचे गुणधर्म, व शारीरिक जडणघडणीसाठी असणारे महत्त्व,यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच तृणधान्यांपासून बनविण्यात आलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात प्रामुख्याने समावेश करण्यात यावा, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →