दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ला जिल्हा क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य भंडारा जिल्हा मुख्यालयात एक रॅली काढून जनमानसांना निरोगी राहण्याचा संदेश देऊन प्रचार व प्रसार करण्यात आला . ङाॅ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा , यांनी रॅलीचा शुभारंभ केला .

आज दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ला जिल्हा क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य जिल्ह्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची भंडारा जिल्हा मुख्यालयात एक रॅली काढून जनमानसाच्या आहारात ज्वारीची भाकर , बाजरी चा समावेश करून निरोगी राहण्याचा संदेश देऊन प्रचार व प्रसार करण्यात आला . ङाॅ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा , यांनी रॅलीचा शुभारंभ केला . श्री अविनाश कोटांगळे उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा, श्री पद्माकर गिदमारे उपविभागीय कृषी अधिकारी साकोली , श्री मिरासे तालुका कृषी अधिकारी मोहाडी, श्री काळे, तालुका कृषी अधिकारी तुमसर, श्री घोगरे तालुका कृषी अधिकारी पवनी , श्री पात्रीकर तालुका कृषी अधिकारी लाखनी, श्री ढवळे तालुका कृषी अधिकारी साकोली व लाखांदूर , हे यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते . या रॅलीला मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद भंङारा यांनी भेट दिली . ही रॅली भंडारा शहरातील मुख्य रस्त्याने फिरून क्रीडा संकुलात एकत्र झाली.त्यानंतर जिल्हा क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला . या क्रीडा महोत्सवात पौष्टिक तृणधाण्याचा आहारात वापर वाढवणे व जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र वाढवणे या विषयावर कर्मचारी व अधिकारी यांनी पथनाट्य सादर केले . तृणधान्य आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या महोत्सवाच्या दरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पौष्टिक तृणधान्य ज्वारीच्या भाकरी व पिठले इ चे भोजन देण्यात आले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →