मौजे आरोंदाता. सावंतवाडी येथे येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम तसेच तृणधान्य पाककला स्पर्धा

गुरुवार दिनांक २६/०१/२०२३ रोजी मौजे आरोंदा येथे”आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023″ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम तसेच तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमास सरपंच श्री सुभाष नाईक सर,व ग्राम पंचायत सदस्य श्री सिध्येश नाईक,श्री केरकर,श्रीम.शिल्पा नाईक मॅडम व सातेरी भद्रकाली ग्राम संघातील महिला उपस्थित होत्या.श्रीमती. प्रिया पवार मॅडम कृषी सहाय्यक ,आरोंदा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तसेच् मा. श्री गव्हाणे साहेब कृषी पर्यवेक्षक सावंतवाडी 1 यांनी कृषी विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन केले, PMFME DRP श्री चव्हाण साहेब यांनी PMFME योजने विषयी माहिती दिली, आत्मा BTM श्रीम.मिनल परब यांनी आत्मा अंतर्गत योजनांची माहिती दिली.श्री.अक्षय चव्हाण साहेब कृषी सहाय्यक, कोलगाव यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले.आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” 2023 मेळाव्याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सांगता श्रीम. स्वाती नाईक ग्राम संघ अध्यक्ष यांनी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →