कुडाळ जि सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात .

मार्गदर्शन करताना ‍जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.दत्तात्रय दिवेकर साहेब
पाककला स्पर्धेतील नाचणीची इडली

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून तालुकास्तरीय कार्यशाळा तालुका कृषि अधिकारी कुडाळ कार्यालयाचे वतीने मराठा समाज सभागृह कुडाळ येथे आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी आयोजीत करण्यात आली.
सदर कार्यशाळेस मा दत्तात्रय दिवेकर साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग, मा अजित आडसुळे उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी, यानी योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन केले
बँक ऑफ इंडिया चे अधिकारी श्री गावडे साहेब व युनियन बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या अधिकाती श्रीमती सावुळ यानी कर्ज वितरण पद्धती, मिरर खाते याबाबत माहिती देवुन उपस्थित शेतकऱ्यांचे याबाबतीत शंका निरसन केले. डीआरपी सौ स्वप्नाली कदम यांनी लाभार्थी निवड, अर्ज भरणे, प्रकल्प अहवाल तयार करणे बाबत मार्ग दर्शन केले.
PMFME लाभार्थी प्रसाद सावंत व कालिंदी कुडतरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तृण धान्य पिकांचे आहारातील महत्त्व यावर डॉक्टर सौ प्रियांका पटाडे यानी आपले विचार मांडले. पारंपरिक बियाणे उत्पादक शेतकरी श्री सूर्यकांत कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व नियोजन तालुका कृषि अधिकारी कुडाळ सौ अश्विनी घाटकर यानी केले.
कार्यशाळेस सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषि सहायक तसेच प्रक्रिया उद्योग उभारणीस इच्छुक शेतकरी, बचत गट प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
यावेळी पौष्टिक तृण धान्य संबंधित प्रक्रिया पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →