तळवडे ता. सावंतवाडी येथे तृणधान्य वर्ष शेतकरी मेळावा

आज 27/1/2023 रोजी तळवडे तृणधान्य वर्ष शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्रीमती देसाई मॅडम यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक श्री गव्हाणे सर यांनी मिरची व इतर भाजीपाला वरील कीड रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती घाडि मॅडम यांनी तृणधान्य व त्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती मीनल परब मॅडम यांनी आत्मा अंतर्गत घेतले जाणारे विविध उपक्रम व शेती गट स्थापन करणे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक ममता तुळसकर प्रिया सावंत मॅडम, श्रीमती मेस्त्री मॅडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →