जि.सांगली – जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

सांगली जिल्ह्यामध्ये दि.२१ व २२ .०१.२०२३ रोजी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन श्री.राजे रामराव महाविद्यालय जत जि.सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रत्येक तालुक्याने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने वेगवेळ्या प्रकारे सादरीकरण केले. पोषाखावर आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ चे लोगो टाकण्यात आले होते. दोन दिवस भोजनामध्ये विशेषता जत ची प्रसिद्ध बाजरीची भाकरीचा समावेश करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बसवराज बिराजदार वि.कृ.स.सं., कोल्हापूर हे होते. त्याच बरोबर प्रमुख उपस्थिती श्री. प्रकाश सूर्यवंशी जि.अ.कृ.अ., सांगली, श्रीमती प्रियांका भोसले कृ.उ.सं.सांगली, उ.वि.कृ.अ., ता.कृ.अ., स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →