तासगाव जि.सांगली

आज बुधवार दिनांक 25/1/2023 रोजी मौजे नागाव कवठे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथेआंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत हुरडा उत्सव संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात मा श्री सागर खटकाळे उपविभागीय कृषी अधिकारी विटा यांनी मानवी आहारातील पौष्टीक तृणधान्य चे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवी आरोग्य विकारांनी ग्रस्त झाले आहे . हे मानवी आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य चे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 2023हे वर्ष आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याचे सांगितले. मा. श्री एस के अमृतसागर तालुका कृषी अधिकारी तासगाव यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून सांगितले तसेच तृणधान्य चे आहारातील प्रमाण वाढण्याकरिता हुरडा उत्सव सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे सांगितले. हुरडा उत्सवाचे नियोजन पीक स्पर्धा विजेते श्रीरामचंद्र तुकाराम पाटील, नागाव कवठे यांच्या शेतावर करण्यात आले त्यावेळी रस्त्यावरील प्रवासी बांधवांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. अशाप्रकारे ज्वारीपासून हुरडा करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे मत व्यक्त केले
सदर कार्यक्रमास श्री रामचंद्र तुकाराम पाटील, श्री बाळासाहेब पाटील, श्री आर आर पाटील मंडळ कृषी अधिकारी सावळज , श्री कोरटे बी एन कृषी पर्यवक्षक मणेराजूरी 2, सौ मोहिते एस एस कृषी सहाय्यक नागाव कवठे, श्री हुसैन कदम कृषी सहाय्यक तासगाव,श्री राहुल माने कृषी सहाय्यक वासूंबे,श्री सचिन खरमाटे कृषी सहाय्यक गव्हाण, श्री संजय देसाई पोलीस ,पाटील नागाव कवठे, शेतकरी, पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपक कांबळे मंडळ कृषी अधिकारी मणेराजूरी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ मोहिते एस एस कृषी सहाय्यक नागाव कवठे यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →