जत जि.सांगली

आज दिनांक 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून अंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत, मा श्री मनोज वेताळ सो यांचा मार्गदर्शनाखाली उप विभाग स्तरावर जत येथे मा आ श्री विक्रमसिंह ( दादा ) सावंत सो यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन मार्गदर्शन केले. उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच वेगवेगळे तृणधान्य वापरून रांगोळी काढलेली शालेय विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री मेडीदार तालुका कृषी अधिकारी जत, श्री तोडकर तालुका कृषी अधिकारी क महांकाळ, सौ दीपाली जाधव तंत्र अधिकारी, दोन्ही तालुक्यातील शेतकरी व कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मा आ महोदयांनी त्यांचा भाषणात कृषि विभागाचे कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री लहू कांबळे यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →