पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा नियोजन भवन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

पाककला प्रदर्शन पाहणी करताना मा.जिल्हाधिकारी महोदय
मा जिल्हाधिकारी पालघर यांनी अशी शपथ घेतली

आज दिनांक २७ जानेवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी पालघर येथे पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनास मा.जिल्हाधिकारी श्री.बोडके सर यांनी भेट दिली.व विविध पदार्थ कसे तयार केले आणि त्याची विक्री कशी जाते याबाबत माहिती घेतली.दिप प्रज्वलन नंतर मा.जिल्हाधिकारी यांनी घडीपत्रीका आणि पोस्टर याचे विमोचन केले.त्यानंतर लगेच पाककला स्पर्धेत सहभागी झालेले आणि स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या गटांना प्रशस्तीपत्र आणि रकमेचे चेक अदा करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या गटास ₹५०००/-, द्वितीय क्रमांकासाठी ₹३०००/-,तृतीय क्रमांकासाठी ₹२०००/- रकम धनादेश अदा करण्यात आली.यानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी पौष्टीक तृणधान्य आहारात वापरणे बाबत किती आवश्यक आहे याबाबत माहिती दिली आपल्या आरोग्याचे दृष्टीने पौष्टीक तृणधान्य नाचणी, ज्वारी, बाजरी रोजच्या आहारात करावा असे आवाहन केले.यावेळी महोदयांनी सेल्फी पॉइंट मध्ये फोटो घेत सर्वांनी अशी पौष्टीक तृणधान्य बाबत शपथ सर्वांनी घ्यावी,असे आवाहन केले. मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिलीप नेरकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजना आणि पौष्टीक तृणधान्य बाबत प्रास्ताविक केले. मा. श्री मेघनाथ कांबळे राज्य समन्वयक पुणे यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन त्यानंतर नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक मा.श्री.सुधांशू अश्विनी यांनी नाबार्डच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन दुपारच्या भोजनामध्ये उपस्थित शेतकरी गट व अधिकारी यांच्यासाठी पौष्टिक गुणधर्म पासून बनवलेले ज्वारीच्या भाकरी आणि नाचणीचा शिरा देण्यात आला.दुपारचे सत्रात पौष्टिक तृणधान्य बाबत, आरोग्यविषयक महत्व मा.श्रीमती रुपाली देशमुख मॅडम यांनी मार्गदर्शन केले. सर्वांनी पौष्टीक तृणधान्य पासून बनविलेले खाद्यपदार्थ दैनंदिन आहारात खाण्यात आणावे व आरोग्य राखावे असा संदेश त्यांनी दिला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →