नवलाख उंबरे येथे ताकृअ, मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व विषयक जनजागृती प्रभातफेरी

आज दिनांक 26/01/2023 नवलाख उंबरे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी, मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व विषयक माहिती मुलांना दिली.पौष्टिक तृणधान्य विषयक घोषणा दिल्या , गावात पौष्टिक तृणधान्या जनजागृती प्रभातफेरी घेतली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण केले. ग्रामसभेस उपस्थित राहून मग्रारोहयो अंतर्गत कामांचे लेबर बजेट 2022-23 (पुरवणी) & 2023-24 याबाबत प्रोसिडिंगवर विषय अंतर्भूत केला, ग्राम कृषी विकास समिती सभा घेतली व विषयाचे वाचन केले. महाडीबीटी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग योजना व सर्व शासकीय योजना बाबत माहिती दिली त्यावेळी उपस्थित गावाचे सरपंच सविताताई बधाले उपसरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर तलाठी मोहराबी मलबारी व सर्व ग्रामस्थ शेतकरी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →