आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे- कुडाळ तालुका-जावळी ,जिल्हा सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

मौजे- कुडाळ तालुका-जावळी ,जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष सन 2023 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी जावळी श्री रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ श्री ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक वक्ते श्री. भानुदास चोरगे कृषी सहाय्यक, पी. व्ही.खाडे कृषी सहाय्यक व महिलां शेतकरी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला शेतकरी यांना श्री. भानुदास चोरगे यांनी नाचणी ,वरई , राजगिरा, ,ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सदर पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी सौ.मंगल मर्ढेकर कुडाळ यांनी उपस्थित सर्व महिला चे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →