जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार, दिनांक 17/01/2023 रोजी ‘’आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’’ साजरा  

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार, दिनांक 17/01/2023 रोजी ‘’आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’’ साजरा करण्याचे निमित्ताने जिल्हा कार्यालयातील सर्व कृषी कर्मचारी महिलांनी एकत्रित येवून पौष्टिक तृणधान्याचे महिलांचे आरोग्यासाठीचे महत्व सर्वांना समजावून सांगितले. यावेळी ज्वारी , बाजरी, नाचणी , वरी व राळा या धान्याचे प्रदर्शन देखील करण्यात आले. नाचणीमध्ये प्रोटीन व फायबरचे प्रमाण जास्त असून साखरेचे आजारासाठी देखील उपयोगी आहे हे सांगितले. तसेच महिलानी आपल्या कुटुंबातील आहारात तृण धान्याचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →