डहाणु तालुक्यातील बोर्डी येथे पौष्टीक तृणधान्य पाक कृती स्पर्धा आयोजन

आज19/9/2023रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्त बोर्डी तेरफडे येथे तेरफडे मित्र मंडळाच्या गणपती उत्सवा मधे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .त्या मधे आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023निमित्त पौष्टिक तृणधान्या पासून बनवलेल्या पाककृती चे स्पर्धाही घेण्यात आली. यावेळी त्या भागातील कृषि पर्यवेक्षक म्हणून मला स्पर्धेचे परीक्षक म्हणून महिलांनी आग्रहाचे निमंत्रित केले .यावेळी 16महिलांनी सहभाग घेतला .खूपच सुंदर अश्या पाककृती बनवून त्याची छान मांडणी केलेली होती .स्पर्धेचे गुणांकन हे पदार्थाची चव, वापरण्यात आलेले घटक ,आणि मांडणी यावरून करण्यात आले यात तीन क्रमांक निवड केली . खूप सुंदर कार्यक्रम झाला यावेळी कृषि पर्यवेक्षक विशे मॅडम यांनी महिलांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व,pmfme या योजना बद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.ज्योती पाटील मॅडम ही उपस्थित होत्या .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →