मौजा-डोमा तालुका-चिमूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ अंतर्गत दि.०३/०८/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमा प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना तृणधाण्याचे आहारामध्ये महत्व याविषयी माहिती देण्यात येऊन विविध तृणधान्य पिकांची ओळख करून देण्यात आली. यावेळी श्री.बी.सी.फरकाडे कृ.प.शंकरपूर,श्री.नन्नावरे सर, मुख्याध्यापक,श्री.चौधरी सर, इतर शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.