तालुका कृषी अधिकारी सडक अर्जुनी मार्फत पौष्टिक तृणधान्य दिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे

आज दिनांक 14/01/2023 ला मौजा घाटबोरी येथे ” दुर्गामाता मंदिर,हळदीघाट देवस्थान” येथे मकरसंक्रांत निमित्त यात्रेमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय सडक/अर्जुनी मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती देऊन त्याचे दैनंदिन आहारातील महत्त्व पटवून देण्यात आले व त्यांची लागवड विषयी माहिती देऊन लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमात उद्यान पंडित शेतकरी श्री.देवाजी बनकर, ता. कृ.अ. प्रतिक्षा मेंढे मेंढे , कृ प. ब्राह्मणकर , भालाधरे , कृ स गहाने , बिसेन , कृषि मित्र मेश्राम, लंजे व इतर शेतकरी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →