डहाणू तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील सरपंच , उपसरपंच यांचे हस्ते पौष्टीक तृणधान्य मिनिकिट वाटप

दिनांक ११ जुलै रोजी ब्राह्मणवाडी येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम – शेत तेथे पौष्टीक तृणधान्य अंतर्गत नागली बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गावाचे सरपंच , उपसरपंच उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती आशा करबट यांनी नागली खाद्यपदार्थ व भाकरी आपल्या आहारात आणणे अतिशय गरजेचे आहे असे सांगितले. उपसरपंच बाळकृष्ण वनगा यांनीआपल्या कडे असलेल्या वरकस जागेत नागली व तूर लागवड करून आपल्या उत्पादन वाढवावे. असे आवाहन केले.येथील कृषि सहाय्यक मंदा सापटे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत नागली लागवड करुन क्षेत्र वाढीस मदत करावी असे सुचविले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →