डहाणू तालुक्यात पौष्टिक तृणधान्य महत्व बाबत मुलाना आत्मा अंतर्गत मार्गदर्शन

काल दिनांक:-२७/०४/२०२३
मोजे जामशेत येथे बाल नंदनवन निसर्गशाळा येथे ५वी ते 10 वी विद्यार्थ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .त्या शिबिरामध्ये कृषि विभाग, आत्मा चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री नामदेव वाडीले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषी विषयक आवड निर्माण व्हावी याकरिता कंपोस्ट खत तयार करण्याच्या ढीग, उखिरडा पद्धती बद्दल माहिती दिली. त्याचबरोबर जमीन आरोग्य ,माती नमुने तपासणी बाबत माहिती दिली .
श्री अशोक महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आय सी एम टाळी शिकवली त्यानंतर विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य नागली, ज्वारी, बाजरी, राजगिरा इत्यादी यांचा आहारामध्ये वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले .तृणधान्यांमध्ये पालघर जिल्ह्यातील प्रमुख तृणधान्य नागली पिकाचे फायदे सांगितले. त्यामध्ये नागली मध्ये प्रथिने विटामिन्स फॉस्फरस प्रमाण जास्त असते .अमिनो ऍसिड मुबलक प्रमाणात असतात. कॅल्शियमची उपलब्धता अधिक प्रमाणात असते. कोलेस्टर चे प्रमाण नियंत्रित करते. बद्धकोष्ठता साठी फायदेशीर. Coplex carbohyderates, (कर्बोदके)प्रथिनामुळे कुपोषणावर उपयुक्त. मधुमेह रुग्णांकरता लाभदायक त्याचबरोबर नागलीपासून विविध पदार्थ नागली सत्व, आंबील लाडू ,बिस्किट ,डोसा, शेवया बाबत माहिती दिली व जास्तीत जास्त तृणधान्ये आहारामध्ये समाविष्ट करण्याबाबत मार्गदर्शन केले.
फॅमिली नेट वेसल टेक्नॉलॉजी बाबत विद्यार्थ्यांना घरगुती कचरा पासून गांडूळ खत निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना दाखविले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रानभाज्या चे महत्व त्यांचा उपयोग आहारामध्ये समाविष्ट करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे संचालक श्री गायकवाड सर ,मुख्याध्यापिका पाटील मॅडम ,शिक्षक कर्मचारी श्री विकास तांडेल सर ,सर्व शिक्षक, ८५ विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →