देवरूख जि . रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त सृष्टी विज्ञान संस्था देवरूख यांचेमार्फत शेतकरी महिला गौरव सोहळ्याप्रसंगी पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक ११/०३/२०२३ रोजी देवरूख जि . रत्नागिरी येथे नक्षत्र हॉल मध्ये सृष्टी विज्ञान संस्था देवरूख यांचेमार्फत शेतकरी महिला गौरव सोहळा पार पडला,त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी संगमेश्वर कार्यालयाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. सदर मेळाव्यात सेंद्रिय शेती, पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व, नाचणी पिकाची लागवड,महिला बचत गट आणि त्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ, भाजीपाला लागवड,प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना इत्यादी विषयांची माहिती देण्यात आली.या मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →