मौजे चिखली तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे IYOM बाबत जनजागृती करण्यात आली.

आज दिनांक 13 मे 2023 रोजी मौजे चिखली तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे *कृषी प्रक्रिया सप्ताह प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग* योजनेअंतर्गत उपस्थित शेतकरी वर्गाला तालुका कृषी अधिकारी पोलादपूर मा श्री एन वाय घरत साहेब यांनी नाचणी व इतर तृणधान्यावर आधारित लघुउद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच नाचणीपासून लाडू व पापड तयार करण्याची पद्धत त्याचे फायदे इतर योजनांची माहिती दिली कार्यक्रमात उपसरपंच निवृत्ती खंडाळे ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र बांदल कृषी मित्र श्री बापूराव बांदल माझी पाटील बाबाजी बांदल पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी व मुंबईहून आलेले चाकरमानी उपस्थित होते कार्यक्रमाचा स्वागत नारळ स्वीकारताना गावकऱ्याकडून शपथ घेतली की आम्ही एखादा लघुउद्योग सुरू करू गावकऱ्यांनी वचन दिल्यानंतर नारळ स्वीकारला गेला या कार्यक्रमास मार्गदर्शनानंतर बांबू लागवडीबाबत हमी देण्यात आली कार्यक्रमास कृषी सहाय्यक श्रीमती सुषमा शेडगे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री कपिल पाटील उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →