जिल्हा परिषद शाळा हातीव ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

दिनांक 1/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा हातीव ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करून त्यानंतर नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहित देण्यात आली त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड,बिस्कीट,नाचणी ची वडी, चकली,इडली इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली.तसेच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळालेले हातीव प्रशालेचे नाचणी मळणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.सदरील कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक देवरूख श्रीम. आजगावकर मॅडम व कृ.से दोरकडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य ,प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →