विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त माध्यमिक विद्यालय बोरगाव येथे निबंध स्पर्धेचे आयोजन

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त माध्यमिक विद्यालय बोरगाव येथे मार्गताम्हणे मंडळ ता.चिपळूण जि.रत्नागिरी मार्फत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना नाचणीचे आहारातील महत्त्व हा विषय निबंध लिहिण्यासाठी देण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यातून काही उत्कृष्ट निबंध निवडून त्या विद्यार्थ्यांना मा. तालुका कृषी अधिकारी यांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी श्री. राहुल आडके , तसेच मार्गताम्हणे मंडळ मधील कृषी पर्यवेक्षक श्री. डी के काळे, श्री. एल डी शिंदे तसेच सर्व कृषी सहायक उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी उपस्थित राहून नियोजनामध्ये मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →